Latest

देशाच्या राजधानीत अहिल्यानगरचा डंका ; दिल्लीच्या कुतुब मिनारवर झळकली हिवरे बाजारच्या संघर्षाची गाथा

एका छोट्याशा गावाने अशी कामगिरी केली की, आता त्याची प्रेरणादायी कहाणी देशाच्या राजधानीत दाखवली जाणार आहे ! अहिल्यानगर जिल्ह्यातील हिवरे बाजार गावाने पुन्हा एकदा महाराष्ट्राची मान उंचावली आहे.

पद्मश्री पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांच्या एकजुटीने उभे राहिलेले हिवरे बाजारचे आदर्श विकास मॉडेल आता दिल्लीतील ऐतिहासिक कुतुब मिनारवरील अत्याधुनिक लेझर शोमध्ये झळकणार आहे.

या विशेष सादरीकरणातून देशभरातील आणि परदेशातील पर्यटकांना भारतात सकारात्मक बदल घडवणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि गावांची माहिती दिली जाते. त्यामध्ये हिवरे बाजारचा समावेश होणे ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे.

जलसंधारण, लोकसहभाग, पारदर्शक कारभार आणि शाश्वत विकासाच्या बळावर हिवरे बाजारने देशासमोर आदर्श निर्माण केला आहे. एका गावाच्या जिद्दीने आणि सामूहिक प्रयत्नांनी काय बदल घडू शकतो, याचे हे जिवंत उदाहरण आज संपूर्ण देशाला प्रेरणा देत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button