Latest

निलेश लंके प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्याकडून २२ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार !

नोकरीचं आमिष… लॉज… नशेचा आरोप… आणि सात जणांविरोधात गुन्हा! पुणे जिल्ह्यातील शिरूरमधून २२ वर्षीय तरुणीवरील कथित सामूहिक बलात्काराचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे.

फिर्यादीनुसार, तरुणी नोकरीच्या शोधात होती. चांगला पगार मिळवून देण्याचं आमिष दाखवत तिला कारमधून शिरूरमधील एका लॉजवर नेण्यात आलं. १९ ते २१ ऑगस्टदरम्यान तिला नशेचा पदार्थ देण्यात आल्याचा आणि त्यानंतर तिच्यावर इच्छेविरुद्ध वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणातील आरोपींपैकी एक व्यक्ती खासदार निलेश लंके यांचा कार्यकर्ता असून त्याच्या सोशल मीडिया अकाउंट वर निलेश लंके प्रतिष्ठानच्या अहिल्यानगर दक्षिण जिल्हा युवक अध्यक्षपदावर असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे या गंभीर गुन्ह्याच्या आरोपामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे.

या प्रकरणात दीपक श्रीमंदीलकर, अजय घेगडे, ऋषीकेश ढवळे, दीपक भोसले, सागर ढवळे, अनिकेत पठारे आणि एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकरणात अनिकेत पठारे याचे नाव समोर आल्यानंतर त्याचा राजकीय संबंध हा चर्चेचा मुद्दा बनला आहे. पठारे हा खासदार निलेश लंके यांचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जात असल्याने, या प्रकरणावर निलेश लंके किंवा त्यांच्या प्रतिष्ठानकडून काय भूमिका मांडली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button