Latest

काय सांगता ! महाराष्ट्रातील ‘या’ गावात गणेशोत्सवचं साजरा केला जात नाही……कोणाच्याच घरात बसत नाहीत गणपती ; कारण काय ?

सध्या देशभर गणेशोत्सवाची धूम आहे. महाराष्ट्रात तर सर्वच गावांमध्ये गणपती बसवले जातात. पण, आज आपण अशा एका गावाची माहिती पाहणार आहोत जिथे कोणाच्याच घरात गणपती बसत नाहीत. तर मंडळी सातारा जिल्ह्यातील कृष्णाकाठी वसलेलं अंगापूर गाव गणेशोत्सवाच्या अनोख्या परंपरेमुळे चर्चेत आहे.

या गावात तब्बल साडेतीनशे वर्षांपासून घरोघरी किंवा सार्वजनिक मंडळांमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना केली जात नाही. कारण गावात स्वयंभू गणेशमूर्तीचं प्राचीन मंदिर आहे.

गणेशोत्सवाऐवजी येथे भाद्रपद शुद्ध चतुर्थी आणि पंचमीला भद्रोत्सव मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. चतुर्थीला ‘दोऱ्या’चा कार्यक्रम होतो. गावाभोवती तब्बल ६५ किलोमीटरची अनवाणी परिक्रमा शेकडो भक्त करतात.

‘दोऱ्या म्हणा मोरया, मोरया म्हणा दोऱ्या’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमतो. पंचमीला दीक्षित मानकरी डोक्यावर पेटतं भद्रपात्र घेऊन गावातून प्रदक्षिणा करतात. मंदिरात पाच प्रदक्षिणा आणि नवसासाठी आलेल्या महिलांची ओटी भरल्यानंतर उत्सवाची सांगता होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button