Latest

आषाढी वारीनंतरचं महाराष्ट्रात मोठा पाऊस पडणार? पंजाबराव डखांनी सांगितली तारीख !

वारकरी घरी परततील… आणि त्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा पावसाची दमदार एंट्री होणार? असा अंदाज समोर आलाय.
आषाढी वारीनंतर महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार, १६ ते १९ जुलैदरम्यान राज्यात हलका आणि विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. मात्र, आषाढी वारी परतल्यानंतर म्हणजेच २१ जुलैपासून पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

२१ जुलै ते ५ ऑगस्ट या कालावधीत राज्यातील अनेक भागांत चांगला ते मुसळधार पाऊस होऊ शकतो. विदर्भात सर्वाधिक पावसाचा अंदाज असून, अहिल्यानगर, पुणे, नाशिक, नंदूरबार, सोलापूर, बीड, लातूर, धाराशीव, नांदेड आणि सांगली जिल्ह्यांनाही चांगल्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः विदर्भातील शेतकऱ्यांनी २० जुलैपूर्वी शेतीची महत्त्वाची कामे पूर्ण करून घ्यावीत, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button