
जेवण उशिरा मिळाल्याच्या वादातून भरदिवसा एका हॉटेल मालकाच्या हत्येने संपूर्ण श्रीरामपूर हादरलंय. मंडळी, हॉटेल मालक आकाश दुबय्या यांच्या हत्येनंतर शहरात बंद पाळण्यात आला असून व्यापारी आणि नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुबय्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि श्रीरामपूरमधील वाढत्या गुन्हेगारीवर गंभीर चिंता व्यक्त केली. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं की, “श्रीरामपूर क्राईमचं कॅपिटल होत आहे.”
गुन्हेगारांना नेमकं कोणाचं पाठबळ आहे, याचा सखोल तपास व्हावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच अवैध धंद्यांचे जाळे उखडून टाकण्यासाठी पोलिसांनी कोणत्याही दबावाशिवाय कठोर कारवाई करावी, असंही त्यांनी सांगितलं.
या प्रकरणामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या संपूर्ण घटनेकडे आता राज्याचं लक्ष लागलं असून, पुढे प्रशासन कोणती ठोस पावलं उचलतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं? कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा.





