Latest

श्रीगोंद्यात रक्तरंजित थरार ! एकाचे दोन्ही हात तलवारीने तोडले ! जुन्या राजकीय वादातून भावकीतील लोकांनीच केला हल्ला

जुना राजकीय वाद आणि टोकाचा राग… याच रागातून श्रीगोंद्यात एक धक्कादायक घटना घडली आहे, ज्याने संपूर्ण परिसर हादरलाय!
अहिल्यानगरच्या श्रीगोंदा शहरातील मांडवगण रस्त्यावर रोहिदास हरिश्चंद्र डांगडे यांच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला करण्यात आला.

या भयंकर हल्ल्यात त्यांचे दोन्ही हात मनगटापासून तुटले असून, त्यांच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. सध्या पुण्यात एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हा हल्ला त्यांच्याच भावकीतील लोकांशी असलेल्या ५ वर्षांच्या जुन्या राजकीय वादातून झाला. ११ जुलै रोजी रोहिदास घरी जात असताना सहा जणांनी त्यांना अडवले. जीव वाचवण्यासाठी ते शेजारच्या घरात घुसले. तिथे उपस्थित तीन महिलांनी हात जोडून विनंती केली, तरीही हल्लेखोरांनी त्यांच्यावर वार केले.

या प्रकरणी राधिका रोहिदास डांगडे यांच्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. या वाढत्या गुन्हेगारीबद्दल तुम्हाला काय वाटतं?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button