
“रिटायरमेंटनंतर पैसे फक्त FD मध्ये ठेवणे पुरेसे आहे का?” हा प्रश्न आज अनेक ज्येष्ठ नागरिकांना पडतो. कारण महागाई सतत वाढत आहे आणि फक्त निश्चित व्याजावर भविष्यातील खर्च भागवणे कठीण होऊ शकते. त्यामुळे आर्थिक तज्ज्ञ आता सीनियर सिटीजन्सनाही मर्यादित प्रमाणात म्युच्युअल फंडाचा विचार करण्याचा सल्ला देत आहेत.
मंडळी, म्युच्युअल फंडाचे सर्वात मोठे फायदे म्हणजे महागाईवर मात करण्याची क्षमता. योग्य इक्विटी किंवा हायब्रिड फंड दीर्घकालीन काळात चांगला परतावा देऊ शकतात. तसेच SWP म्हणजे Systematic Withdrawal Plan च्या मदतीने दर महिन्याला पेन्शनसारखे नियमित उत्पन्नही मिळवता येते.
तज्ज्ञांच्या मते, संपूर्ण रक्कम एकदम गुंतवण्याऐवजी SIP किंवा टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे अधिक सुरक्षित ठरते. यामुळे बाजारातील चढ-उतारांचा धोका कमी होतो.
मात्र, गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गरजा, जोखीम क्षमता आणि वय लक्षात घेऊन योग्य फंड निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य नियोजन केल्यास रिटायरमेंटनंतरही तुमचे पैसे सुरक्षित राहू शकतात आणि सतत वाढूही शकतात.





