Latest

शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासह एकूण 26 खासदारांची खासदारकी जाणार ? 20 जुलैच्या आत निकाल लागणार !

शिवसेना ठाकरे गटातून बंड केलेले शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासह ६ खासदारांचं सदस्यत्व रद्द होणार का ? याचा निर्णय आता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हातात आहे.

काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातील ९ पैकी ६ खासदारांनी बंड करून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर ठाकरे गटाने लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार दाखल करत, संबंधित खासदारांना पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्र घोषित करण्याची मागणी केली.

बंडखोर खासदारांचा दावा आहे की, एकूण खासदारांपैकी दोन-तृतीयांश सदस्य त्यांच्या बाजूने असल्याने त्यांचा निर्णय कायदेशीर आहे. मात्र ठाकरे गटाच्या मते फक्त खासदारांनी गट बदलला म्हणून विलिनीकरण होत नाही. संपूर्ण पक्षाने अधिकृतपणे विलिनीकरणाचा निर्णय घेतलेला असणे आवश्यक आहे. याच मुद्द्यावर आता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला निर्णय देणार आहेत.

हा निर्णय केवळ ठाकरे गटातील ६ खासदारांसाठीच नाही, तर अशाच प्रकारे बंड केलेल्या तृणमूल काँग्रेसच्या २० खासदारांबाबतही महत्त्वाचा ठरू शकतो. आता सर्वांचे लक्ष एका प्रश्नाकडे लागले आहे—हे खासदार पात्र ठरणार की अपात्र? कारण याच निर्णयावर पुढील राजकीय समीकरणे अवलंबून असू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button