
अहिल्यानगरमधील शिक्षकांमध्ये आता तीव्र नाराजी उसळली आहे. विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत जिल्ह्यातील शिक्षक ९ जुलै रोजी सामूहिक रजेवर जाणार असून जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करणार आहेत.
शिक्षकांचे म्हणणे आहे की, टीईटी परीक्षेमुळे अनेक शिक्षकांच्या सेवेत अस्थिरता निर्माण झाली आहे.
पदोन्नतीच्या संधी हिरावल्या गेल्या आहेत. याशिवाय बीएलओची जबाबदारी शिक्षकांवर टाकल्यामुळे शैक्षणिक कामावर मोठा परिणाम होत आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले, तरी शिक्षकांना अध्यापनापेक्षा अशैक्षणिक कामांमध्येच अधिक वेळ द्यावा लागत आहे. शालाबाह्य विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासारखी महत्त्वाची कामेही मागे पडत असल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे.
शिक्षक संघटनांच्या मते, बीएलओच्या अतिरिक्त कामामुळे शिक्षकांवर मानसिक आणि शारीरिक ताण वाढत आहे. त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. त्यामुळे सरकारने शिक्षकांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच, सन २०१३ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटी परीक्षेतून सूट द्यावी, संचमान्यता धोरण रद्द करावे आणि इतर प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे. मंडळी तुम्ही शिक्षकांच्या मताशी सहमत आहेत का? कमेंट करा..





