Latest

ATM चा शोध कोणी लावला, भारतातील पहिलं ATM कुठे सुरू झालं ? जाणून घ्या हा भन्नाट इतिहास !

आज आपण ATM मधून काही सेकंदांत पैसे काढतो, पण तुम्हाला माहित आहे का ? ATM चा जनक कोण आणि भारतात पहिलं ATM नेमक कुठे सुरु झालं ? नाही, मग जाणून घेऊयात. मंडळी, भारताचे पहिले ATM हे राजधानी मुंबईत सुरु झालंय.

सन 1987 मध्ये मुंबईच्या अंधेरी भागात HSBC बँकेने देशातील पहिलं ATM सुरू केलं. त्या काळात इंटरनेट आणि संगणकीकरण फारसं विकसित नव्हतं. त्यामुळे बँकेत न जाता मशीनमधून पैसे मिळतात, ही गोष्ट लोकांसाठी आश्चर्यकारक होती.

सुरुवातीला अनेकांना ATM वापरण्याची भीती वाटायची. “कार्ड अडकलं तर?”, “पैसे मिळाले नाहीत तर?” असे प्रश्न लोकांच्या मनात असायचे. त्यामुळे सुरुवातीला फक्त काही मोजके लोकच ATM वापरत होते. ATM च्या शोधामागेही एक रंजक गोष्ट आहे. त्याचे जनक जॉन शेफर्ड बॅरन यांचा जन्म भारतातील शिलाँग येथे झाला होता.

बँक बंद झाल्यानंतर पैसे काढता आले नाहीत, याच अनुभवातून ATM ची कल्पना जन्माला आली. आज भारतात 2.5 लाखांहून अधिक ATM आहेत आणि काही सेकंदांत होणारा हा व्यवहार एकेकाळी लोकांसाठी चक्क जादूसारखा होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button