Latest

एलपीजी, पेट्रोल-डिझेल सांभाळून वापरा ! युद्ध थांबले तरी तेल संकट कायम राहणार ; कारण, 2027 पर्यंत….

इराण-अमेरिका युद्ध थांबलं तरी जगभर पेट्रोल-डिझेल महागच राहणार ? कारण होर्मुज खाडीत निर्माण झालेलं संकट 2027 पर्यंत चालू राहू शकतं!

मंडळी, इराण आणि अमेरिका संघर्षामुळे जगभरातील तेल बाजार हादरला आहे. युद्ध थांबण्याची चर्चा सुरू असली तरी परिस्थिती अजूनही गंभीर मानली जात आहे. जगातील सर्वात महत्त्वाच्या ऊर्जा मार्गांपैकी एक असलेल्या होर्मुज खाडीतून मोठ्या प्रमाणात कच्चं तेल आणि वायू वाहतूक केली जाते.

मात्र या भागात मागील काही महिन्यांपासून तणाव वाढला आहे. संयुक्त अरब अमिरातीतील सरकारी तेल कंपनी ADNOC चे प्रमुख सुलतान अल जाबेर यांनी मोठा इशारा दिला आहे. त्यांच्या मते, युद्ध आज संपलं तरी तेलपुरवठा पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी 2027 पर्यंत वाट पाहावी लागू शकते.

होर्मुज खाडीत सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. काही भागांमध्ये गुप्त बॉम्ब सुरंग टाकल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जहाजांची वाहतूक धोकादायक बनली आहे.

आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेनेही याला इतिहासातील मोठं ऊर्जा संकट म्हटलं आहे. याचा परिणाम पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरांवर जगभर दिसू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button