Latest

अहिल्यानगरमध्ये ‘या’ गावात थरार ! कोयत्याने हाणमार करत भीषण दरोडा,चौघे गंभीर

जामखेड तालुक्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या वेळी सात ते आठ दरोडेखोरांच्या टोळीने एका घरावर धाडसी दरोडा टाकत चौघांवर कोयते, गज आणि काठ्यांनी जीवघेणा हल्ला करत लूटमार केली. यात चौघे गंभीर जखमी आहेत.

ही घटना फक्राबाद येथील आढाव वस्तीवर रविवारी मध्यरात्री घडली. मिळालेल्या माहितीनुसार, कौशल्या आढाव या आपल्या कुटुंबीयांसह घरासमोरील पडवीत झोपल्या होत्या. रात्री सव्वा एकच्या सुमारास सात ते आठ जणांची टोळी तेथे आली, त्यांनी झोपलेल्या कुटुंबीयांवर अचानक हल्ला चढवला.

दरोडेखोरांनी कोयते, लोखंडी गज आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात कौशल्या आढाव, अंगद आढाव, मैनाबाई पारे आणि सुभद्रा आढाव हे गंभीर जखमी झाले. त्यापैकी कौशल्या आढाव, अंगद आढाव आणि मैनाबाई पारे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यात हलविण्यात आले आहे. तर सुभद्रा आढाव यांच्यावर जामखेड येथे उपचार सुरू आहेत.

मारहाण केल्यानंतर दरोडेखोर घरात घुसले. त्यांनी घरातील सामानाची उचकापाचक करत कपाटातील ४० हजार रुपये रोख रक्कम आणि साडेतीन तोळे सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख ९० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. दरम्यान आरडाओरड्याने नागरिक मदतीसाठी धावले, मात्र तोपर्यंत दरोडेखोर अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button