Latest

प्रतीक्षा संपली….! अहिल्यानगरमध्ये तीन महिन्यांनी पावसाचे कमबॅक; ‘या’ गावांमध्ये लागली हजेरी

अहिल्यानगर जिल्ह्यात तब्बल तीन महिन्यांच्या खंडानंतर रविवारी पावसाने पुन्हा हजेरी लावली. नगर शहरासह पारनेर, श्रीगोंदा, जामखेड आणि नगर तालुक्यातील काही भागांत हलक्या ते मध्यम सरी बरसल्या.

पावसामुळे सुकत चाललेल्या पिकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी शेतकऱ्यांची चिंता अजून कायम आहे. कारण पावसाच्या मोठ्या खंडामुळे खरीप हंगामातील बाजरी, मूग आणि उडीद पिकांना मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी पिके पूर्णपणे करपून गेली आहेत.

पारनेरमधील जवळे, निघोज, आळकुटी, श्रीगोंद्याचा पूर्व भाग, नगर तालुक्यातील वाळकी आणि जामखेडमधील खर्डा परिसरात पावसाने हजेरी लावली.

सुरुवातीच्या पावसावर शेतकऱ्यांनी बाजरी, मूग, उडीद, सोयाबीन आणि कपाशीची पेरणी केली होती. मात्र पावसाने दडी मारल्याने मोठे नुकसान झाले. आता शेतकऱ्यांची मागणी स्पष्ट आहे—करपलेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करा आणि नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button