
“वजन वाढतंय, पाळी अनियमित आहे, केस गळतायत?” तर हे PCOD किंवा PCOS चे संकेत असू शकतात. पण घाबरू नका! योग्य लाईफस्टाईल बदलांमुळे ही समस्या मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आणता येते. यासाठी सर्वात आधी तुमच्या आहाराकडे लक्ष द्या.
जंक फूड, साखर आणि मैद्याचे पदार्थ कमी करा. त्याऐवजी फळे, भाज्या, कडधान्ये आणि ड्रायफ्रुट्स खा. यामुळे हार्मोन्स संतुलित राहण्यास मदत होते. दररोज किमान ३० मिनिटे चालणे, योगा करणे, हलका व्यायाम करणे, विशेषतः भुजंगासन आणि बटरफ्लाय पोझ PCOS साठी फायदेशीर मानले जातात. पुरेशी झोप आणि भरपूर पाणी हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
रात्री ७-८ तास झोप घेतल्याने स्ट्रेस हार्मोन्स कमी होतात. तणाव कमी ठेवणे हे सर्वात गरजेचे आहे.
मेडिटेशन, संगीत किंवा आवडता छंद मन शांत ठेवण्यास मदत करतो. लक्षात ठेवा, PCOD/PCOS हा आजार नाही तर लाईफस्टाईलशी संबंधित विकार आहे. योग्य सवयी अंगीकारल्या तर तुमचे आरोग्य नक्कीचं सुधारू शकते.





