
कॉलेजमधून थेट शेतीत..आणि रखरखत्या उन्हात फुलवला ढोबळी मिरचीचा हिरवागार मळा.. अहिल्यानगर जिल्ह्यातील एका तरुणीची ही प्रेरणादायी कहाणी सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
मंडळी, श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील प्राजक्ता राजेंद्र काकडे हिने अनेक तरुणांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केलाय. बी.एस्सी. अॅग्रीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर आणि एमबीएची पदवी मिळवल्यानंतर तिने शहरातील नोकरीचा मार्ग न निवडता थेट शेतीची वाट धरली.
घरची परिस्थिती, शेतीतील तोटा आणि वडिलांवरील कर्जाचे ओझे पाहून प्राजक्ता स्वतः शेतात उतरली. ऐन उन्हाळ्यात तिने एक एकर क्षेत्रावर ढोबळी मिरचीची लागवड केली.
पिकाला आवश्यक असलेले खत व्यवस्थापन, पाणी नियोजन आणि औषध फवारणी याकडे तिने बारकाईने लक्ष दिले. शिक्षणातून मिळालेले ज्ञान आणि प्रत्यक्ष श्रम यांच्या जोरावर तिने ढोबळी मिरचीचा उत्कृष्ट मळा उभा केला.
विशेष म्हणजे सध्या बाजारात ढोबळी मिरचीला चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे प्राजक्ता आणि तिच्या वडिलांच्या मेहनतीला योग्य न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मंडळी, शेती ही केवळ परंपरा नाही, तर योग्य नियोजन आणि आधुनिक ज्ञानाच्या मदतीने ती यशस्वी व्यवसायही ठरू शकते, हे प्राजक्ताने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे, तुम्हाला काय वाटत? कमेंट करा..





