Latest

शेतकऱ्यांसाठी कही ख़ुशी कही गम ! सोयाबीनचा विमा मंजूर, कपाशीला रुपयाही नाही..

शेतकऱ्यांसाठी एकीकडे आनंदाची बातमी आहे, तर दुसरीकडे चिंतेची.. कारण हजारो शेतकऱ्यांच्या खात्यावर सोयाबीन पीक विम्याचे पैसे जमा झाले आहेत. मात्र, कपाशी उत्पादक शेतकरी अजूनही विम्याच्या प्रतीक्षेत आहेत.

मंडळी, गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे श्रीरामपूर तालुक्यासह अनेक भागात सोयाबीन आणि कपाशी या दोन्ही पिकांचे मोठे नुकसान झाले होते. अनेक शेतांमध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबरपर्यंत पाणी साचून राहिले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

या नुकसानीनंतर पीक विम्यातून दिलासा मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. त्यापैकी सोयाबीन उत्पादकांना आता काहीसा दिलासा मिळाला आहे. श्रीरामपुर तालुक्याच्या विचार करता, तालुक्यातील तब्बल ८ हजार ३१९ शेतकऱ्यांच्या खात्यावर १७ कोटी ९६ लाख रुपयांचा पीक विमा जमा करण्यात आलेत.

मात्र, दुसरीकडे कपाशी उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी वाढत आहे. कारण अतिवृष्टीमुळे कपाशीचेही मोठे नुकसान झाले होते, पण अजूनही विम्याची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. त्यामुळे अनेक शेतकरी तहसील कार्यालय आणि कृषी विभागाच्या फेऱ्या मारत आहेत. मंडळी, सोयाबीन उत्पादक समाधानी आहेत, तर कपाशी उत्पादक अजूनही विम्याच्या प्रतीक्षेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button