Latest

पारनेरमधील धक्कादायक घटना ! सोसायटीचे संचालक समजून दुसऱ्याचेच अपहरण, मग पुढे जे घडलं ते फारच भयानक

सोसायटीचा संचालक समजून अपहरण… पण काही मिनिटांतच आरोपींना समजलं, त्यांनी चुकीच्या व्यक्तीला उचललं !

मंडळी, अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात घडलेल्या या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. ५५ वर्षीय किराणा व्यावसायिक अशोक चेडे हे काम आटोपून घरी परतत असताना दोन कारमधून आलेल्या ७ ते ८ जणांनी त्यांची गाडी अडवली.

चालकासह त्यांना मारहाण करून जबरदस्तीने दुसऱ्या कारमध्ये बसवण्यात आले आणि धरण परिसराकडे नेण्यात आले. आरोपींना वाटलं की चेडे हे एका सोसायटीचे संचालक आहेत.

मात्र चौकशीदरम्यान खरी ओळख समोर आल्यानंतर त्यांना आपली चूक लक्षात आली. त्यानंतर आरोपींनी चेडे यांच्या हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या आणि गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून घेतली.

तब्बल सात तोळ्यांचे दागिने लुटल्यानंतर त्यांना रस्त्यात सोडून आरोपी पसार झाले. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button