Latest

चंदनचोरांचा नंगानाच वनकर्मचाऱ्याला झाडाला बांधले, बेदम मारले… त्यानंतर केले असे की

चंदन चोरीच्या घटना गेल्या काही दिवसांपासून मंदावल्या होत्या. परंतु आता थेट अहिल्यानगर शहरातील वन विभागाच्या मुख्य कार्यालय परिसरातच चंदन चोरांनी नंगानाच केलाय. शनिवारी म्हणजेच 18 एप्रिलला पहाटे या चंदन चोरांनी कार्यालय परिसरात धुमाकूळ घातला.

वन विभागाच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करुन त्याला झाडाला बांधले. त्यानंतर त्याच्यासमोरच 20 हजार रुपये किंमतीच्या चंदनाच्या झाडाची लाकडे चोरांनी लंपास केली. रमेश पोपट शेळके (वय 58, रा. गुंडेगाव) असे या वनकर्मचाऱ्याचे नाव आहे.

शेळके यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाणे गाठत त्यांच्यावरील आपबिती सांगितली. शनिवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पहाटे चार अज्ञात इसम वनविभागाच्या कार्यालय परिसरात शिरले त्यांनी शेळके यांना मारहाण करत नंतर झाडाला बांधून ठेवले.

या फिर्यादीनंतर भिंगार कॅम्प पोलिसांनी तत्काळ या प्रकरणाचा तपास सुरु केला. पोलिस निरीक्षक योगेश पवार यांनी आरोपींच्या शोधासाठी पथके तयार केली आहेत. दरम्यान, चंदन चोर पुन्हा सक्रीय झाल्याने वनविभागासह सामान्यांचीही झोप उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button