Latest

पारनेरकरांनो सावधान ! घराच्या उंबरठ्यापर्यंत बिबट्याची दहशत ! ‘या’ भागात दोन ते तीन बिबट्यांचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

रात्री शेतात जाण्याआधी सावध व्हा ! पारनेर शहरालगतच्या वाड्यावस्त्यांवर बिबट्याची दहशत वाढली आहे! विधाटे वस्ती, वैद्य वस्ती, खोडदे वस्ती, मते मळा, महाजन मळा, कानिफनाथ मळा आणि वरखेड मळा परिसरात गेल्या काही दिवसांपासून दोन ते तीन बिबट्यांचा वावर असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत.

वैद्य वस्ती येथे शेतकरी शांताराम नामदेव वैद्य यांच्या घरासमोरील झाडावर ठेवलेल्या कोंबड्यांवर बिबट्याने हल्ला केला. याच परिसरात त्यांच्या एका म्हशीच्या पारडीवरही हल्ला होऊन ती ठार झाली. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सागर वैद्य यांनी वन विभागाला माहिती दिली. वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला, मात्र अद्याप बिबट्या हाती लागलेला नाही.

१९ सप्टेंबरच्या रात्री कानिफनाथ मळा परिसरातही बिबट्याचा वावर दिसल्याचे सांगण्यात येत आहे. मागील काही दिवसांत १० ते १२ कोंबड्या फस्त केल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

वीजपुरवठा खंडित असल्याने रात्री परिसरात अंधार वाढतो. त्यामुळे वन विभागाने गस्त वाढवून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button