
अहिल्यानगर जिल्ह्यासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय पोषण पंधरवड्यात संपूर्ण देशात अहिल्यानगरने पहिला क्रमांक पटकावलाय. मंडळी, महिला व बाल विकास विभागांतर्गत सुरू असलेल्या आठव्या राष्ट्रीय पोषण पंधरवड्यात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जनजागृती उपक्रम राबवले जात आहेत.
९ एप्रिल ते २३ एप्रिल या कालावधीत जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये हे उपक्रम सुरू आहेत. आतापर्यंत तब्बल ३ लाख २४ हजारांहून अधिक उपक्रमांची नोंद झाली असून, यामुळे अहिल्यानगरने देशात अव्वल स्थान मिळवलं आहे. पुणे जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर, तर बिहारमधील मुझफ्फरपूर तिसऱ्या क्रमांकावर आहे.
या पंधरवड्यात बालकांच्या आयुष्यातील पहिल्या सहा वर्षांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. कारण या काळातच मुलांचा मेंदू आणि शारीरिक विकास सर्वाधिक वेगाने होत असतो. यामध्ये माता आणि बालकांचे पोषण, शून्य ते तीन वर्षांच्या मुलांचा मेंदू विकास, तीन ते सहा वर्षांच्या मुलांसाठी खेळावर आधारित शिक्षण, तसेच मुलांचा स्क्रीन टाइम कमी करण्यावर भर दिला जात आहे.
मंडळी, हा केवळ एक पुरस्कार नाही, तर संपूर्ण जिल्ह्याच्या एकजुटीचा आणि जागरूकतेचा परिणाम आहे. बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेला हा प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहे. ही अभिमानाची बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. व्हिडीओ शेअर करा, लाईक करा..





