
राज्यातील लाखो शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. महायुती सरकारने निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. जून महिन्यात कर्जमाफी जाहीर होईल, असंही सांगितलं गेलं होतं.
पण आता निवडणूक आयोगामुळे ही घोषणा थांबली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, कर्जमाफीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. आज मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर चर्चा आणि निर्णय होऊ शकतो.
मात्र, निवडणूक आयोगाने “घोषणा करू नका” असे निर्देश दिल्यामुळे अधिकृत घोषणा होणार नाही. दोन दिवसांपूर्वी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही पुढील 10 दिवसांत कर्जमाफीचा निर्णय होईल, असं सांगितलं होतं.
दरम्यान, वाढत्या कर्जबाजारीपणामुळे राज्यात शेतकरी आत्महत्या वाढत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे सरकारवर मोठा दबाव आहे.
याचबरोबर “लाडकी बहीण” योजनेत तब्बल 80 लाख अपात्र लाभार्थी आढळल्याची माहितीही फडणवीसांनी दिली. तर मग मंडळी तुमच्या मते शेतकरी कर्जमाफीचा निर्णय कधी जाहीर होईल?





