Latest

खासदार गेलेत, आता आमदारही फुटणार ? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला चार आमदारांची दांडी; ठाकरे गटात नवा राजकीय भूकंप ?

सहा खासदारांच्या एक्झिटनंतर ठाकरे गटात खळबळ उडालेली असतानाच आता आणखी एक मोठी राजकीय चर्चा सुरु झाली. मंडळी, उद्धव ठाकरे यांनी पक्षातील आमदारांची तातडीची बैठक बोलावली होती. पक्ष एकसंघ असल्याचा संदेश देण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात होती.

मात्र, या बैठकीला चार आमदार गैरहजर राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विधानसभेतील २० पैकी १६ आमदार उपस्थित होते, तर विधानपरिषदेतील सर्व सदस्यांनी हजेरी लावली. पण संजय देरकर, राहुल पाटील, सुनील शिंदे आणि संजय पोतनीस यांच्या अनुपस्थितीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

शिंदे गटाकडून ठाकरे गटातील नेते आणि आमदारांशी संपर्क सुरू असल्याच्या चर्चा आधीच सुरू आहेत. अशा परिस्थितीत या चार आमदारांची अनुपस्थिती केवळ योगायोग आहे की त्यामागे काही मोठी राजकीय रणनीती दडलेली आहे?

पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार का ? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button