Latest

मान्सूनचे दमदार पुनरागमन ! पण, पुढील 48 तास अत्यंत महत्वाचे, ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट

पावसाची प्रतीक्षा अखेर संपली आहे ! पण पुढील 48 तास महाराष्ट्रासाठी का महत्त्वाचे आहेत ? चला जाणून घेऊयात. जूनच्या सुरुवातीलाच मान्सून राज्यात दाखल झाला होता. मात्र, त्यानंतर पावसाने मोठी विश्रांती घेतल्याने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक चिंतेत होते.

आता मात्र मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून अनेक भागांत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 48 तासांत पुणे, धाराशिव, सोलापूर आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतीसाठी पोषक वातावरण निर्माण होणार असून खरीप हंगामाला मोठा दिलासा मिळू शकतो.

दुसरीकडे, विदर्भातील नागरिकांना अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. पुढील तीन ते चार दिवसांत मान्सून यवतमाळ आणि गडचिरोलीपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एकूणच, पुढील काही दिवस राज्यातील पावसाच्या चित्रासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. तुमच्या भागात पावसाने हजेरी लावली आहे का ? कमेंटमध्ये नक्की सांगा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button