Latest

स्कुटीवरून जात असलेल्या युवतीवर बिबट्याचा हल्ला ! लग्नसमारंभात एकच खळबळ 

श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द परिसरात रात्री साडेनऊच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. दबा धरून बसलेल्या बिबट्याने स्कुटीवरून घरी जाणाऱ्या एका युवतीवर अचानक हल्ला केला.

या हल्ल्यात श्रद्धा चंद्रकांत पुजारी ही युवती गंभीर जखमी झाली आहे. प्रथम तिला श्रीरामपूर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले, त्यानंतर अधिक उपचारासाठी अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे.

घटनावेळी परिसरात लग्नसमारंभ सुरू असल्याने मोठी गर्दी होती. युवतीचा आरडाओरडा ऐकताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तिला वाचवण्याचा प्रयत्न केला.

स्थानिकांच्या मते, बेलापूर खुर्द परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्यांचा मुक्त वावर सुरू आहे. वनविभागाकडे वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी आता ग्रामस्थांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button