Latest

तुमच्या मुलाची शाळा बोगस तर नाही? सरकारच्या तपासात धक्कादायक खुलासा

तुमच्या मुलाची शाळा खरंच अधिकृत आहे का…? महाराष्ट्रात तब्बल ४८७ अनधिकृत शाळा आढळल्या आहेत! आणि अनेक पालकांना याची कल्पनाही नाही…

शिक्षण विभागाच्या तपासात राज्यभरातील शेकडो बोगस शाळांचा पर्दाफाश झाला आहे.
मग पालकांनी मुलांचे admission घेण्याआधी काय तपासावे?

१. शासन मान्यता तपासा
शाळेकडे महाराष्ट्र शासनाचे Recognition Certificate आणि NOC आहे का ते पाहा.

२. CBSE / ICSE Affiliation Check करा
शाळा CBSE किंवा ICSE असल्याचा दावा करत असेल, तर त्यांच्या official website वर जाऊन Affiliation Number तपासा.

३. U-DISE नंबर तपासा
प्रत्येक अधिकृत शाळेकडे ११ अंकी U-DISE क्रमांक असतो.
तो नसल्यास सावध व्हा.

४. सुविधा प्रत्यक्ष पाहा
खेळाचे मैदान, अग्निशमन यंत्रणा, वर्गखोल्या आणि सुरक्षित परिसर आहे का ते तपासा.

५. जागा आणि इमारत तपासा
व्यावसायिक इमारतीत किंवा दाटीवाटीच्या परिसरात चालणाऱ्या शाळांबाबत विशेष काळजी घ्या.

फक्त इंग्रजी नाव किंवा मोठी जाहिरात पाहून विश्वास ठेवू नका.
कागदपत्रे नसतील… तर शाळा बोगस असू शकते.

मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे…
Admission घेण्याआधी शाळेची पूर्ण चौकशी नक्की करा.
ही माहिती प्रत्येक पालकांपर्यंत पोहोचवा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button