Latest

यंदा खरिपाचे गणिते बदलले ! मका-सोयाबीनकडे कल; कापसाला फटका

राहुरी तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामाचे संपूर्ण गणित बदलले आहे. यावर्षी शेतकऱ्यांचा कल कापसाकडून मका आणि सोयाबीनकडे वळल्याचे चित्र दिसत आहे.

मंडळी, मृग आणि रोहिणी नक्षत्राने यंदा अपेक्षित साथ दिली नाही. पावसाने सुरुवातीलाच दडी मारल्यामुळे मूग आणि कापूस पिकांना मोठा फटका बसला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपले पीक नियोजन बदलत मका, सोयाबीन, बाजरी आणि तूर या पिकांना प्राधान्य दिले आहे.

कृषी विभागाच्या माहितीनुसार, राहुरी तालुक्यात आतापर्यंत २४ हजार ८१० हेक्टर म्हणजेच सुमारे ७५ टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. अजून २५ टक्के क्षेत्रावर पेरण्या बाकी असून, पुढील काही दिवसांत पाऊस चांगला झाला तर १५ ते २० जुलैदरम्यान उर्वरित पेरण्या पूर्ण होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

यंदा कापूस पिकाला सुरुवातीपासूनच फटका बसला. पुरेसा पाऊस न झाल्यामुळे उगवण नीट झाली नाही आणि वाढही खुंटली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कापसाऐवजी मका आणि सोयाबीनची निवड केली आहे.

परिणामी यंदा मक्याखालील क्षेत्रात लक्षणीय वाढ होण्याची, तर कापसाच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. आता पुढील काही दिवसांत पाऊस कसा पडतो, यावर उर्वरित खरीप हंगामाचे चित्र अवलंबून असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button