
मंडळी, IPL 2026 मध्ये आपल्या स्फोटक फलंदाजीने संपूर्ण क्रिकेटविश्वाचं लक्ष वेधून घेणाऱ्या वैभव सूर्यवंशीबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. BCCI सचिव देवजित सैकिया यांनी थेट निवड समितीला वैभवच्या हिताचे निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे वैभवला लवकरच टीम इंडियातून खेळण्याची संधी मिळू शकते, अशी जोरदार चर्चा सुरू आहे.
सैकिया यांनी वैभवला भारतीय क्रिकेटचा “वंडर बॉय” म्हणत त्याच्या प्रतिभेचं जोरदार कौतुक केलं. त्यांनी सांगितलं की, “वैभवचं टॅलेंट खूप वेगळं आहे आणि भविष्यात तो जगभरात भारताची छाप सोडू शकतो.”
भारताचा आयर्लंड आणि इंग्लंड दौरा जवळ आला असताना निवड समिती वैभवच्या नावावर गंभीरपणे विचार करू शकते. IPL दरम्यान अजित आगरकरसह सर्व सिलेक्टर्स त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवून होते.
सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, इरफान पठाण यांसारख्या दिग्गजांनीही वैभवचं उघडपणे कौतुक केलं आहे. म्हणून आता फक्त एकच प्रश्न आहे — वैभव सूर्यवंशीला टीम इंडियाची कॅप कधी मिळणार ? पण तुम्हाला याबाबत काय वाटतं ?





