Latest

८ वर्षात २३६ किलोमीटरची रेल्वे लाईन झाली ‘डबल’…पण नगर-मनमाड महामार्ग अजूनही ‘अर्धवट’ !

२०११ मध्ये एकाच काळात सुरू झालेले दोन मोठे प्रकल्प… पण २०२६ मध्ये चित्र पूर्णपणे वेगळं आहे. रेल्वेचं काम पूर्ण झालं, मात्र महामार्ग अजूनही अपूर्णच !

मंडळी, २०११ मध्ये मनमाड-दौंड दुहेरी रेल्वेमार्ग आणि नगर-मनमाड महामार्ग या दोन्ही प्रकल्पांची सुरुवात झाली. आज, २०२६ मध्ये मनमाड-दौंडचा २३६ किमी दुहेरी रेल्वेमार्ग पूर्ण झाला असून त्यासोबत विद्युतीकरणाचे कामही पूर्ण झाले आहे.

मात्र त्याच काळात सुरू झालेल्या नगर-मनमाडच्या अवघ्या ७५ किमी महामार्गाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. अनेक ठिकाणी रस्ता खोदून ठेवलेला, मोठे खड्डे आणि अर्धवट कामामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याच कारणामुळे शिर्डी, कोपरगाव आणि श्रीरामपूरकडे जाणारे अनेक प्रवासी आता रेल्वेला पसंती देत आहेत.

ग्राउंड रिपोर्टनुसार काही ठिकाणी अर्धा किलोमीटर अंतर पार करण्यासाठी १५ ते १६ मिनिटे लागत आहेत. एकाच वर्षी सुरू झालेले दोन प्रकल्प… पण प्रगती मात्र पूर्णपणे वेगळी. आता महामार्गाचे काम नेमके कधी पूर्ण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button