Latest

आया-बहिणींच्या सन्मानाशी खेळाल तर सोडणार नाही…; शिर्डीच्या हिंदू जनआक्रोश मोर्च्यात डॉ. सुजय विखे यांची गर्जना

शिर्डीत घडलेल्या विनयभंगाच्या घटनेनंतर वातावरण चांगलेच तापले आहे. सकल हिंदू समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’मध्ये माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला थेट इशारा दिला.

“आमच्या आया-बहिणींच्या सन्मानाशी खेळ करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. कोपरगावप्रमाणेच येथेही आरोपीची धिंड निघाली पाहिजे,” असे ते म्हणाले.

शिर्डी हा साईबाबांच्या सर्वधर्म समभावाचा संदेश देणारा परिसर असला तरी महिलांवरील अत्याचार आणि गुन्ह्यांविरोधात कठोर कारवाई आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोर्चादरम्यान विविध नेत्यांनीही आपली भूमिका मांडत आरोपींविरोधात कठोर शिक्षा आणि प्रशासनाने कडक पावले उचलण्याची मागणी केली. या सभेला शिर्डी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या संपूर्ण प्रकरणावर तुमचे मत काय ? आरोपींवर आणखी कठोर कारवाई व्हायला हवी का? कमेंटमध्ये नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button