Latest

शेतकऱ्यांनो खतांसाठी ‘लिकिंग’ ची सक्ती केल्यास ‘येथे’ करा तक्रार ! थेट कारवाई होणार

शेतकऱ्यांनो, खत खरेदी करताना तुम्हाला जबरदस्तीने इतर उत्पादने घ्यायला लावली जात आहेत का? इतर खतांच्या लिंकिंकची सक्ती केली जात आहे का? तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. राज्य शासनाने आता अशा ‘टॅगिंग’ किंवा ‘लिंकिंग’ प्रकारांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

आता शासनाने स्पष्ट केले आहे की, अनुदानित खतांच्या विक्रीसोबत कोणत्याही प्रकारची सक्ती करता येणार नाही. तसेच निर्धारित दरापेक्षा जादा दराने खतांची विक्री करणेही नियमबाह्य आहे.

कृषी विभागाने स्पष्ट इशारा दिला आहे की, अनुदानित खताची जादा दराने विक्री, लिंकिंग करून विक्री, बोगस विक्री किंवा ई-पॉस मशीनशिवाय विक्री आढळल्यास संबंधित विक्रेत्यावर कठोर कारवाई केली जाईल.

आता प्रश्न आहे, तक्रार कुठे करायची? जर तुमच्याकडून जबरदस्तीने इतर उत्पादने खरेदी करण्यास सांगितले जात असेल, तर तुम्ही थेट नजीकच्या कृषी कार्यालयात, तालुका कृषी कार्यालयात, जिल्हा कृषी कार्यालयात किंवा कृषी उपसंचालक कार्यालयाकडे तक्रार करू शकता. मंडळी, ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button