Latest

एका दिवसात किती कप चहा प्यावा ? वयानुसार योग्य प्रमाण जाणून घ्या !

मंडळी, तुमच्या दिवसाची सुरुवात चहाने होते का ? मग आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. खरेतर, भारतात अनेक लोक दिवसातून ४ ते ५ वेळा चहा पितात. पण जास्त चहा तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो.

डॉक्टरांच्या मते, चहाचं योग्य प्रमाण वय आणि आरोग्यावर अवलंबून असतं. किशोरवयीन आणि तरुणांनी दिवसातून १ ते २ कपांपेक्षा जास्त कॅफीनयुक्त चहा पिऊ नये. तर निरोगी प्रौढांसाठी ३ ते ५ कप ग्रीन टी फायदेशीर मानली जाते.

ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे हृदयरोग, टाईप २ मधुमेह आणि वजन नियंत्रणासाठी मदत करू शकतात. पण जास्त चहा पिल्यास निद्रानाश, अस्वस्थता, डोकेदुखी, पोटदुखी आणि चिंता वाढू शकते.

विशेषतः गर्भवती महिलांनी कॅफीनचं प्रमाण नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे. तज्ज्ञ सांगतात, रिकाम्या पोटी चहा टाळा आणि जेवणानंतर लगेच चहा पिऊ नका. कारण त्यामुळे पचन आणि आयर्न शोषणावर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच, चहा प्या… पण योग्य प्रमाणात !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button