Latest

शासकीय अधिकाऱ्याच्या पत्नीवर अत्याचार, नग्न फोटो आणि व्हिडिओ काढून केल ब्लॅकमेल

राहाता तालुक्यात एक अत्यंत गंभीर आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका शासकीय अधिकाऱ्याच्या पत्नीचे खासगी फोटो आणि व्हिडिओ काढून तिची बदनामी करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप एका व्यक्तीवर करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित महिला एकाच इमारतीत राहत होते. ओळखीचा फायदा घेत आरोपीने महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिचे खासगी फोटो आणि व्हिडिओ तयार करून ते व्हायरल करण्याची तसेच पतीसमोर बदनामी करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

तक्रारीनुसार, या धमक्यांचा आधार घेत आरोपीने महिलेवर अनेक वेळा अत्याचार केल्याचे समोर आले आहे. अखेर पीडित महिलेने धाडस दाखवत पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

या प्रकरणी राहाता पोलिसांनी आरोपी मनोज फकीरा कानकाटे याच्याविरुद्ध बलात्कार, धमकी आणि ब्लॅकमेलिंगसह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. ही घटना समोर आल्यानंतर राहाता-शिर्डी परिसरात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button