Latest

कॅन्सर पेशन्टसाठी Good News ! ‘ही’ एक गोळी ठरू शकते गेमचेंजर

स्वादुपिंडाचा कर्करोग म्हणजे “Silent Killer” म्हणून ओळखला जाणारा अत्यंत धोकादायक कर्करोग. सुरुवातीला लक्षणे दिसत नसल्यामुळे बहुतेक रुग्ण उशिरा डॉक्टरांकडे पोहोचतात. पोटदुखी, अचानक वजन कमी होणे, भूक मंदावणे, त्वचा पिवळी पडणे आणि सतत थकवा ही त्याची प्रमुख लक्षणे आहेत.

आता या कर्करोगाविरोधात “Daraxonrasib” नावाची नवी गोळी आशेचा किरण ठरत आहे. अमेरिकेत झालेल्या संशोधनात 500 गंभीर रुग्णांवर या औषधाची चाचणी करण्यात आली. परिणाम धक्कादायक आणि आशादायक होते !

ही गोळी घेणाऱ्या रुग्णांचे सरासरी आयुष्य 13.2 महिने नोंदवले गेले, तर केमोथेरपी घेतलेल्या रुग्णांचे आयुष्य फक्त 6.6 महिने होते. म्हणजेच जगण्याचा कालावधी जवळपास दुप्पट वाढला.

हे औषध कर्करोगाच्या पेशी वाढवणाऱ्या बदललेल्या प्रथिनांना रोखते, त्यामुळे ट्युमरची वाढ मंदावते. तज्ज्ञांच्या मते, हे औषध पूर्ण इलाज नसले तरी कर्करोग उपचार क्षेत्रातील मोठी क्रांती ठरू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button