Latest

शेतकऱ्यांचा मूड बदलला, ट्रॅक्टर्स खरेदीने मोडले विक्रम !

शेतकऱ्यांचा मूड बदलला आहे, आणि त्याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे ट्रॅक्टर विक्रीचे नवे आकडे. देशभरात ट्रॅक्टर खरेदीने यंदा विक्रम मोडला असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला पुन्हा गती मिळाल्याचे चित्र दिसत आहे.

मंडळी, जून २०२६ या एकाच महिन्यात देशभरात तब्बल १ लाख ८१८ ट्रॅक्टर्सची विक्री झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही तब्बल २५.३ टक्क्यांची वाढ आहे.

चांगल्या मान्सूनची अपेक्षा, खरीप हंगामाची तयारी आणि शेतीच्या यांत्रिकीकरणाला मिळालेला वेग यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नवीन ट्रॅक्टर्स खरेदी केल्याचे दिसून येत आहे.

कंपन्यांच्या विक्रीबद्दल बोलायचे झाल्यास, महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी पहिल्या क्रमांकावर असून तिने २४ हजार ३२७ ट्रॅक्टर्सची विक्री केली आहे. त्यानंतर स्वराजने १८ हजार ८६०, इंटरनॅशनल ट्रॅक्टर्सने १३ हजार १८४, टाफेने १२ हजार ६९ आणि एस्कॉर्ट्स कुबोटाने १० हजार ३७१ ट्रॅक्टर्सची विक्री केली आहे.

जॉन डिअर, आयशर आणि सीएनएच इंडस्ट्रियल यांच्या विक्रीतही चांगली वाढ झाली आहे. मंडळी, ट्रॅक्टर विक्रीतील ही विक्रमी वाढ ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक संकेत मानली जात आहे. आता यंदाचा मान्सून आणि खरीप हंगाम कसा राहतो, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button