Latest

मुळा-ज्ञानेश्वर कारखान्यांच्या निवडणुकांत मोठा राजकीय ट्विस्ट ! निवडणुका बिनविरोध होऊ देणार नाहीत, आ. विठ्ठलराव लंघे

मंडळी, नेवासा तालुक्यातील मुळा आणि ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकांपूर्वी विरोधकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या नेतृत्वाखाली विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि सभासद एकत्र आले असून, प्रस्थापितांविरोधात ताकदीने लढण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

आमदार लंघे यांनी सांगितले की, दोन्ही कारखान्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्व गटांचे सभासद एकत्र आले आहेत. पक्षभेद बाजूला ठेवून निवडणूक लढवली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीत पंचगंगा शुगरचे प्रभाकर शिंदे यांनी विद्यमान व्यवस्थापनावर जोरदार टीका केली. “कारखाना चालवणे म्हणजे रॉकेट सायन्स नाही. पारदर्शक कारभार आणि काटकसर असेल तर कोणताही कारखाना सक्षमपणे चालू शकतो,” असे ते म्हणाले.

दोन्ही कारखान्यांवर ५०० ते ६०० कोटी रुपयांचे कर्ज असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. सभासदांच्या उसाला योग्य सन्मान आणि जबाबदारीने तोडणी-वाहतूक देण्याचे आश्वासन विरोधकांनी दिले. यामुळे आता या निवडणुकीत नेमकं कोण बाजी मारणार ? याकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button