
तुमच्या नावावरचं SIM दुसऱ्याला दिलंय? सावध व्हा ! कारण आता तुमच्या कागदपत्रांवर घेतलेलं SIM दुसऱ्या व्यक्तीला देणं आता महागात पडू शकतं. दूरसंचार विभागाने २१ सप्टेंबरला याबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
तुमच्या नावावर SIM घेऊन ते दुसऱ्याला विकणे, भाड्याने देणे किंवा सायबर फसवणुकीसाठी वापरू देणे, यामुळे मूळ ग्राहकही कायदेशीर अडचणीत येऊ शकतो.
बनावट कागदपत्रांद्वारे SIM घेणे, ओळख लपवून फसवणूक करणे किंवा दुसऱ्याच्या नावावरील SIMचा गैरवापर करणेही गंभीर प्रकार मानले जातात.
नियमांचे उल्लंघन झाल्यास ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि ५० लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असल्याचे वृत्त आहे. छत्तीसगडमधील एका प्रकरणात एजंटने लोकांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून त्यांच्या नकळत २५ SIM सक्रिय केल्याचे समोर आले. त्यानंतर संबंधित क्रमांक बंद करण्यात आले. तुमच्या नावावर अनोळखी नंबर सुरू आहे का, हे संचार साथी पोर्टल किंवा ॲपवर तपासा.





