
ITC कंपनीने आपल्या काही लोकप्रिय सिगारेट ब्रँडच्या किमतीत वाढ केली आहे. त्यामुळे नियमित सिगारेट खरेदी करणाऱ्यांना आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
Classic Connectच्या 20 सिगारेटच्या पॅकेटची किंमत 390 रुपयांवरून थेट 428 रुपये झाली आहे. म्हणजेच एका पॅकेटसाठी 38 रुपये अधिक मोजावे लागतील.
तर Gold Flake Super Starच्या 10 सिगारेटच्या पॅकेटची किंमत 79 रुपयांवरून 89 रुपये करण्यात आली आहे. या पॅकेटसाठी आता 10 रुपये अधिक द्यावे लागतील. विशेष म्हणजे 2026 मध्ये या ब्रँडच्या किमती याआधीही वाढवण्यात आल्या आहेत.
Classic Connectची किंमत 300 रुपयांवरून 360 रुपये, तर Gold Flake Super Starची किंमत आधी 59, नंतर 70 आणि 79 रुपये अशी वाढत गेली. कररचनेतील बदलांमुळे तंबाखू उत्पादनांच्या किमती वाढल्याचे सांगितले जात आहे. पण, धुम्रपान आरोग्यास गंभीर धोका निर्माण करू शकते.





