
ग्रामीण भागातील युवकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी मोठी संधी समोर आली आहे. मंडळी, पशुसंवर्धन विभागाच्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत दुग्ध व्यवसाय, शेळी-मेंढीपालन आणि कुक्कुटपालन यांसारख्या व्यवसायांना मोठं प्रोत्साहन दिलं जात आहे. या योजनेत पाच दुधाळ गायी किंवा म्हशीसाठी सुमारे ११.३५ लाख रुपयांचा प्रकल्प मंजूर होऊ शकतो.
शेळी आणि मेंढीपालनासाठी ११ लाख रुपयांपर्यंतचा प्रकल्प मिळू शकतो, तर कुक्कुटपालनासाठी ३० लाखांपर्यंत मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळणार आहे.
या योजनेचं खास वैशिष्ट्य म्हणजे, अनुदान थेट लाभहस्तांतरणाद्वारे म्हणजेच थेट पशुपालकांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे पारदर्शकता राखली जाणार आहे. यामुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत आणि कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून ती पूर्णपणे ऑनलाइन असणार आहे.
शासनाकडून लवकरच सविस्तर नियम आणि मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या जाणार आहेत. मंडळी, जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर ही संधी तुमच्यासाठी खूप मोठी आहे. योग्य वेळी अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या. ही माहिती इतरांपर्यंत नक्की पोहोचवा.





