Latest

भेसळ थांबताच दुधाचे टँकर गायब ! दुग्धव्यवसायातील धक्कादायक वास्तव समोर

दुभत्या गायी कमी झाल्या, शेतकरी व्यवसाय सोडत आहेत… तरीही बाजारात दूध भरपूर कसे? आता या प्रश्नाचे उत्तर समोर येत आहे !
मंडळी, तुकाराम मुंढे आल्यापासून राज्यात भेसळविरोधी मोहिमेला वेग मिळाला आणि दूध संकलनात मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे.

दररोज 30 ते 35 टँकर दूध कमी येत असल्याची चर्चा असून, यामुळे भेसळीच्या प्रमाणावर पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
एकेकाळी ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधार देणाऱ्या दुग्धव्यवसायाने हजारो कुटुंबांचे जीवन बदलले.

मात्र दुधाचे घसरलेले दर, वाढलेला पशुखाद्य खर्च, लम्पी रोग आणि नैसर्गिक संकटांमुळे अनेक शेतकऱ्यांनी दुभती जनावरे विकली. तरीही बाजारातील दूध पुरवठा कमी झाला नव्हता.

आता कठोर तपासण्या सुरू झाल्यानंतर संकलन घटल्याने संशय अधिक गडद झाला आहे. प्रामाणिक दूध उत्पादकांना योग्य दर आणि ग्राहकांना शुद्ध दूध मिळण्यासाठी भेसळीविरोधातील कारवाई सातत्याने सुरू राहणे गरजेचे आहे. तुमच्या मते दुधातील भेसळ पूर्णपणे थांबवणे शक्य आहे का? कमेंटमध्ये मत नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button