Latest

10 वर्षाचा वनवास संपला ! राज्य सरकारच्या निर्णयामुळे अहिल्यानगरचे ५३२ कर्मचारी होणार ‘पर्मनंट’

मंडळी, अहिल्यानगर जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजेच एनएचएम अंतर्गत काम करणाऱ्या ५३२ कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने १० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाला मंजुरी दिली आहे.

या निर्णयामुळे स्टाफ नर्स, औषधनिर्माता, अकाउंटंट, समुपदेशक आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी समकक्ष पदे निर्माण केली जाणार आहेत. सातव्या वेतन आयोगानुसार किमान मूलभूत वेतन, महागाई भत्ता आणि प्रवास भत्त्याचाही लाभ मिळणार आहे.

मात्र, या पदांवर नवीन भरती होणार नाही. कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर किंवा सेवा संपल्यानंतर ती पदे आपोआप रद्द होतील. तसेच पदोन्नती, निवृत्तीवेतन आणि अनुकंपा नियुक्तीचा लाभ मिळणार नाही.

तरीही, अनेक वर्षे कंत्राटी सेवेत काम करणाऱ्या ५३२ कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय मोठा दिलासा मानला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button