
फक्त पाठदुखी समजून दुर्लक्ष करताय ? हा एक साधा त्रास नसून गंभीर आजाराचा इशाराही असू शकतो ! मंडळी एका २७ वर्षीय महिलेला महिनाभर सतत पाठदुखीचा त्रास होत होता. वेदनाशामक औषधे घेत असूनही आराम मिळत नव्हता.
दरम्यान, तिला स्तनात गाठ जाणवल्याने तिने डॉक्टरांचा सल्ला घेतला. तपासणीनंतर धक्कादायक सत्य समोर आले—तिला चौथ्या टप्प्यातील स्तनाचा कर्करोग असल्याचे निदान झाले आणि तो मणक्यांपर्यंत पसरला होता.
तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक पाठदुखी किंवा प्रत्येक गाठ म्हणजे कर्करोग असे नसते. मात्र, अनेक आठवडे टिकणारी वेदना, स्तनात नवीन गाठ, त्वचेत किंवा स्तनाग्रात बदल, तसेच शरीरातील कोणतेही असामान्य लक्षण दुर्लक्षित करू नये.
तरुण वय म्हणजे पूर्ण संरक्षण नाही. वेळेत तपासणी आणि लवकर निदान झाल्यास उपचार अधिक प्रभावी ठरतात. त्यामुळे शरीर देत असलेले संकेत ओळखा, स्वतःची नियमित तपासणी करा आणि कोणताही संशय वाटल्यास तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.





