Latest

काय सांगता ! श्रीरामपूर नगरपालिकेत उघड झाला नवा खुर्ची घोटाळा ? वाचनालयासाठी घेतली चक्क ८ हजारांची एक खुर्ची ! नेमक प्रकरण काय ?

मंडळी, श्रीरामपूर नगरपरिषदेच्या वाचनालयासाठी खरेदी करण्यात आलेल्या खुर्च्यांमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. कारण या खरेदीत एका सागवानी पॉलिश केलेल्या खुर्चीसाठी तब्बल ८ हजार रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे.

नगरपरिषदेने एकूण ५५ खुर्च्या खरेदी केल्या असून ही खरेदी २०२३-२४ च्या वार्षिक टेंडरमधून करण्यात आली. मात्र स्थानिक फर्निचर व्यावसायिकांच्या मते, अशाच प्रकारच्या खुर्च्या बाजारात साधारण ५ हजार ते ६ हजार ५०० रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. यामुळे नगरपरिषदेने बाजारभावापेक्षा जास्त पैसे मोजले का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वाद आणखी वाढण्याचे कारण म्हणजे या खुर्च्यांची नोंद असलेले स्टॉक रजिस्टर उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात किती खुर्च्या खरेदी झाल्या आणि त्या कुठे आहेत, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

या प्रकरणात काही अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असलेली कागदपत्रेही चर्चेत आहेत. त्यामुळे संपूर्ण व्यवहाराची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. खरोखर गैरव्यवहार झाला की सर्व प्रक्रिया नियमानुसार झाली ? याचे उत्तर आता चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button