
मंडळी, कल्पना करा… तुमचं वय आहे तिथे थांबलं, तुमच्या शरीरातील वृद्ध पेशी पुन्हा तरुण होऊ लागल्यात तर ? आणि वय वाढलं तरी म्हातारपणाची गती कमी झाली तर ? जे आजपर्यंत फक्त विज्ञानकथांमध्ये पाहायला मिळत होतं, ते आता वास्तवाच्या दिशेने एक पाऊल पुढे गेलं आहे !
अमेरिकेतील बोस्टनमधील Life Biosciences या बायोटेक कंपनीने वैद्यकीय क्षेत्रात मोठा टप्पा गाठला आहे. जगातील पहिल्या Partial Cellular Reprogramming क्लिनिकल ट्रायलमध्ये एका मानवी रुग्णाला ER-100 नावाच्या प्रायोगिक उपचाराचा डोस देण्यात आला आहे.
या उपचारामध्ये विशेष जनुकीय तंत्रज्ञानाचा वापर करून वृद्ध झालेल्या पेशींना पुन्हा सक्रिय आणि तरुण बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या ही चाचणी काचबिंदू आणि वयोमानामुळे दृष्टी गमावणाऱ्या रुग्णांवर केली जात आहे. संशोधकांच्या मते, यामुळे खराब झालेल्या पेशी पुनर्जीवित होऊन दृष्टी सुधारण्यास मदत होऊ शकते.
या तंत्रज्ञानाचा पाया 2006 मध्ये घातला गेला होता आणि त्यासंबंधीच्या संशोधनाला 2012 मध्ये नोबेल पुरस्कारही मिळाला होता.
मात्र लक्षात ठेवा, हे संशोधन अजून सुरुवातीच्या टप्प्यात आहे. त्यामुळे “अमरत्व” मिळालं असं म्हणणं अजून लवकर आहे. पण भविष्यात म्हातारपणाचा वेग कमी करण्यासाठी हे संशोधन क्रांतिकारी ठरू शकतं. पण विज्ञानाची ही झेप तुम्हाला कशी वाटते? कमेंटमध्ये नक्की सांगा!





