
दूध उत्पादकांसाठी महत्वाची बातमी आहे. आता दुधात भेसळ आढळली, तर तपासणी पथक थेट गोठ्यात येणार आहे. त्यामुळे दूध संकलन केंद्रांसह दूध उत्पादकांमध्येही खळबळ उडाली आहे. मंडळी, राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाने दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे.
संशयास्पद दूध संकलन केंद्रांवर छापे टाकले जात आहेत आणि दोषी आढळणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करून परवाने रद्द करण्याची कारवाई सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर शेवगाव तालुक्यातील अनेक दूध संकलन केंद्रांनी आपल्या सभासदांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
ज्या दूध उत्पादकांच्या दुधाच्या गुणवत्तेबाबत शंका असेल, त्यांच्या गोठ्यावर थेट भेट देण्यासाठी विशेष तपासणी पथक नेमण्यात आले आहे. तपासणीदरम्यान दुधात पाणी टाकल्याचे आढळले तरी ती भेसळच मानली जाणार आहे. तसेच मीठ, साखर, सोडा किंवा इतर कोणत्याही प्रकारची रासायनिक भेसळ आढळल्यास संबंधित उत्पादकांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई होऊ शकते.
दरम्यान, दुसरीकडे शेतकऱ्यांचे म्हणणे वेगळे आहे. दुधात भेसळ करणारे सामान्य दूध उत्पादक नाहीत, तर केमिकल वापरून मोठ्या प्रमाणावर बनावट दूध तयार करणारी मोठी रॅकेट्स आहेत. त्यामुळे कारवाई खऱ्या दोषींवर व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. मंडळी, तुमचं काय मत आहे? कमेंट करा..





