Latest

१३ वर्षीय ओमकारचा कारखाली चिरडून मृत्यू; कुटुंबीयांचा घातपाताचा आरोप

राहाता शहरात हृदयद्रावक घटना घडली आहे. आपल्या आजीसोबत बाहेर चाललेल्या १३ वर्षीय ओमकार गायकवाड याचा भरधाव कारच्या धडकेत मृत्यू झाला.ही घटना गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास राहाता येथील कृष्ण मंदिरासमोर घडली. जखमी अवस्थेत ओमकारला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.ओमकारचे आजोबा पांडुरंग गायकवाड यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, भरधाव इर्टिका कारने आधी ओमकारच्या आजीला धडक दिली आणि त्यानंतर ओमकारला जोरदार धडक दिली.

धडकेनंतर ओमकार खाली पडला असताना कारचालकाने गाडी रिव्हर्स घेऊन त्याच्या पोटावरून चाक फिरवल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय नातेवाईक आणि ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. आरोपीवर तातडीने कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी पोलिस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button