
महाराष्ट्रातील वाहनधारकांसाठी एक मोठा दिलासादायक निर्णय समोर आलाय. गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेली वाहन फिटनेस चाचणी आणि पासिंग सेवा आता पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत.
मंडळी, राज्यातील अनेक आरटीओ कार्यालयांमध्ये ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशन म्हणजेच एटीएस प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित नसल्यामुळे फिटनेस तपासणीची प्रक्रिया ठप्प झाली होती. याचा सर्वाधिक फटका बसला तो व्यावसायिक वाहनधारकांना.. ज्यामध्ये रिक्षा, टॅक्सी, स्कूल बसेस आणि मालवाहतूक वाहनांचा समावेश आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने वाहन फिटनेस आणि नूतनीकरण प्रक्रियेसाठी ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे हजारो रिक्षाचालक, टेम्पो चालक आणि लहान वाहतूकदारांना मोठा दिलासा मिळालाय.
कारण एटीएस प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे राज्यातील जवळपास १५ लाख व्यावसायिक वाहनांचे नूतनीकरण थांबले होते. अनेक वाहनधारकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला होता.
आता मात्र ही प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे. मंडळी, हा निर्णय वाहनधारकांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. जर तुमचं वाहन फिटनेस किंवा नूतनीकरणासाठी अडकलेलं असेल, तर आता तुम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे.
ही माहिती इतर वाहनधारकांपर्यंत नक्की पोहोचवा.





