Latest

डीलिमिटेशननंतर अहिल्यानगर जिल्ह्यात तयार होणारे तीन लोकसभा मतदारसंघ कसे असतील ? कोणते तालुके कोणत्या मतदारसंघात ?

अहिल्यानगर जिल्ह्यात भविष्यात तीन खासदार निवडून जाण्याची शक्यता आहे. पण या तीन मतदारसंघांमध्ये नेमके कोणते तालुके असतील? आणि कोणता भाग कोणत्या मतदारसंघाला जोडला जाईल? सांगतो पण त्याआधी अहिल्यानगर पॉलिटिक्सला फॉलो नक्की करा.

मंडळी, लोकसभा मतदारसंघांच्या संभाव्य पुनर्रचनेनुसार जिल्ह्याचे उत्तर, दक्षिण आणि अहिल्यानगर असे तीन भाग होऊ शकतात.
यामध्ये उत्तर मतदारसंघात अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहाता आणि श्रीरामपूर या तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.
दक्षिण मतदारसंघात नेवासा, शेवगाव, पाथर्डी, श्रीगोंदा, कर्जत आणि जामखेड हे तालुके येऊ शकतात.

तर अहिल्यानगर मतदारसंघात अहिल्यानगर शहर, नगर तालुका, राहुरी आणि पारनेरचा समावेश होण्याचा अंदाज आहे.
विशेष म्हणजे शिर्डीची जागा खुली होऊन नव्याने तयार होणारा मतदारसंघ राखीव होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

मात्र, ही संभाव्य रचना आहे. अंतिम निर्णय पुनर्रचनेनंतरच स्पष्ट होईल. तर मग मंडळी या नव्या रचनेचा सर्वाधिक फायदा कोणाला होईल? कमेंटमध्ये नक्की सांगा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button