Latest

अहिल्यानगर जिल्ह्याची लोकसंख्या ५० लाखांचा टप्पा पार करणार…? या तारखेपासून सुरू होणार जनगणना !

मंडळी, अहिल्यानगर जिल्ह्याची लोकसंख्या आता ५० लाखांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. आणि याचा थेट परिणाम भविष्यातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या रचनेवर होऊ शकतो. नेमकं काय घडणार? सांगतो; पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.

जिल्ह्यात २५ जानेवारी २०२७ पासून जनगणनेला सुरुवात होणार आहे. ही प्रक्रिया २८ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. आकडेवारी पाहिली तर १९९१ मध्ये जिल्ह्याची लोकसंख्या ३३ लाख ७२ हजार होती.

२००१ मध्ये ती ४० लाख ८० हजारांवर पोहोचली, तर २०११ मध्ये तब्बल ४५ लाख ४३ हजार झाली. म्हणजेच दहा वर्षांत सुमारे पाच लाखांची वाढ झाली. हाच वाढीचा कल कायम राहिला, तर जिल्हा ५० लाखांचा आकडा पार करू शकतो.

दरम्यान, जनगणनेनंतर मतदारसंघ पुनर्रचनेचा मुद्दाही महत्त्वाचा ठरणार आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या सीमा, संख्या आणि आरक्षणात बदल होण्याची शक्यता आहे.

मात्र, अंतिम निर्णय घटनात्मक तरतुदी आणि केंद्र सरकारच्या पुढील प्रक्रियेवर अवलंबून असेल. तर मग मंडळी तुमच्या मते अहिल्यानगरमध्ये मतदारसंघ वाढायला हवेत का? कमेंट करून नक्की सांगा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button