Latest

शिर्डीतील साईबाबांच्या चरणी १ किलो सोन्याचा हिरेजडित हार; किंमत ऐकून व्हाल थक्क ! साईभक्ताची गुप्त देणगी चर्चेत

शिर्डीच्या साईदरबारात एका भक्ताने अशी देणगी अर्पण केली आहे, ज्याची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल! नेमकं काय घडलं? सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.

मंडळी, मुंबईतील एका साईभक्ताने श्री साईबाबांच्या चरणी तब्बल एक किलो वजनाचा सोन्याचा हिरेजडित हार अर्पण केला आहे.
विशेष म्हणजे, हा हार केवळ वजनानेच नव्हे, तर किमतीनेही चर्चेत आला आहे. या हाराची किंमत तब्बल १ कोटी १६ लाख ८५ हजार रुपये इतकी आहे.

या हारावर आकर्षक नक्षीकाम करण्यात आले असून, त्याला हिऱ्यांची सुंदर सजावट करण्यात आली आहे. आणखी एक विशेष बाब म्हणजे, एवढी मोठी देणगी देऊनही या साईभक्ताने आपले नाव गुप्त ठेवण्याची विनंती केली आहे.

देणगी स्वीकारल्यानंतर साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी संबंधित भक्ताचा सत्कार केला.

श्रद्धा, भक्ती आणि दातृत्वाचा हा अनोखा संगम सध्या शिर्डीत चर्चेचा विषय ठरत आहे. तर मग मंडळी तुम्हाला या भक्ताच्या दातृत्वाबद्दल काय वाटतं ? कमेंट करून नक्की सांगा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button