Latest

साई-सेवा मल्टिस्टेटची महत्त्वाची मूळ कागदपत्रे गायब ! श्रीगोंदा न्यायालयाचे पोलिसांना थेट तपासाचे आदेश; नेमकं प्रकरण काय?

सहकारी पतसंस्थेच्या कारभारात खळबळ उडवणारी बातमी! श्रीगोंद्यातील साई-सेवा मल्टिस्टेट सहकारी पतसंस्थेची संचालक मंडळाच्या सभेच्या नोंदवह्या, वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त आणि निवडणुकीशी संबंधित महत्त्वाची मूळ कागदपत्रे गायब झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची श्रीगोंदा न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे.

संस्थेचे सचिव गणेश अरुण दोईफोडे यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यानुसार, १० जानेवारी २०२६ रोजी कर्मचाऱ्यांकडून लॉकरच्या चाव्या घेण्यात आल्या. त्यानंतर १४ जानेवारीला लॉकर उघडून कोणतीही अधिकृत परवानगी नसताना महत्त्वाची कागदपत्रे काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. वारंवार मागणी करूनही ती परत मिळाली नसल्याचा दावा आहे.

याप्रकरणी २३ एप्रिल रोजी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र, अपेक्षित कारवाई न झाल्याने सचिवांनी न्यायालयात धाव घेतली.विशेष म्हणजे, केवळ तक्रारदार चौकशीसाठी उपस्थित राहिला नाही म्हणून कथित गुन्हेगारी कृत्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

तसेच, भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १७५ (३) अन्वये तपास करून अंतिम अहवाल सादर करण्याचे आदेश श्रीगोंदा पोलिसांना दिले आहेत. आता या गायब झालेल्या मूळ कागदपत्रांचे गूढ उलगडणार का? पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button